Ad will apear here
Next
देह व अवयवदान जागृती कार्यक्रमाला प्रतिसाद

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल्सच्या सहकार्याने ‘देह व अवयवदान जागृती’ या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ५० नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली. अभिनेत्री पल्लवी पाटील, सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डॉ. शीतल महाजनी, ‘आयएमए, पुणे’चे अध्यक्ष डॉ. संजय पाटील या वेळी उपस्थित होते. 

डॉ. शीतल महाजनी यांनी यकृतारोपण शस्त्रक्रियेची उपयुक्तता, रुग्णांची निवड, कार्यपद्धती याचे विवेचन केले. ‘आयएमए’च्या अवयवदान समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण हळबे यांनी देह व अवयवदानाची संपूर्ण माहिती दिली, तसेच डॉ. वैशाली भारंबे यांनीही देहदानाविषयी सखोल माहिती दिली. देह व अवयवदान महासंघ, मुंबई, नाशिकचे प्रकल्प समन्वयक सुनील देशपांडे यांनी पदयात्रेतून अवयवदान प्रचार व त्याची उपयुक्तता सांगितली. ग्रामीण भागातील कार्याचीही माहिती दिली. फॅमिली फिजिशियन डॉ. विनय कोपरकर यांनी स्वतःच्या यकृतारोपण शस्त्रक्रियेचा अनुभव सांगितला. 

‘आयएमए’चे मानद सचिव डॉ. राजन संचेती यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZUCCH
Similar Posts
जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता!; पुण्यातील करोनामुक्त कुटुंबाच्या भावना पुणे : ‘करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही बरे झालो,’ अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली
करोनाला गांभीर्याने घ्या : डॉ. अविनाश भोंडवे (मार्गदर्शनपर व्हिडिओ) पुणे : ‘विविध माध्यमांतून सर्वत्र करोनाविषयक माहिती उपलब्ध होत असूनही, अजूनही बरेचसे लोक सुरक्षेचे उपाय पाळताना दिसत नाहीत,’ याबद्दल खंत व्यक्त करून ‘करोनाला गांभीर्याने घ्या,’ असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले. पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने
अरुणा केळकर यांना आरोग्य सेवा व्यवस्थापनातील उत्कृष्टता पुरस्कार पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीच्या संस्थापक विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणा केळकर यांना गोल्डन ग्लोब आरोग्यसेवा व्यवस्थापन उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language